दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक अभिजीत देशमुख यांची शाहीन अकॅडमी ला सदिच्छा भेट
लातुर:-शिक्षण क्षेत्रात देशभरात “नीट व जेईईत ” नावलौकिक केलेल्या बिदर येथील “शाहीन’ या संस्थेच्या “शाहीन अकॅडमी लातूर – SAL ” खोरी गल्ली लातूर येथील शाखेला दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक अभिजीत देशमुख स यांनी सदिच्छा भेट दिली.
आपल्या मनोगता मध्ये त्यांनी सांगितले की शासकीय मेडिकल कॉलेज ला प्रवेश मिळालेल्या पाच गरजूवान विद्यार्थ्यांना दरवर्षी दिशा प्रतिष्ठान च्या वतीने आर्थिक मदत केली जाते.
त्यांनी शाहीन अकॅडमी च्या कॅम्पसची पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच अकॅडमीक नियोजन याबाबत चर्चा करून अमूल्य असे मार्गदर्शन केले. इन्फ्रास्टरकचर व अकॅडमीक नियोजनाचे कौतुक केले,
त्यांनी मुली व मुलांसाठी केलेली स्वतंत्र क्लासरूम ची व्यवस्था, मुलींच्या सुरक्षिततेसाठी कॅम्पस मध्ये CCTV कॅमेरा ची केलेली सोय, अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी शाहीन अकॅडमी चे मुख्य समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस मोईज भाई शेख यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी समन्वयक अल्ताफ शेख, ऍड. तौसिफ खतीब , शाहीन अकॅडमी चे प्राचार्य डॉ शाहीद शेख सर, मार्केटिंग हेड नितीन काजळे, वसीम, पूजा महाजन, स्वामी आदी उपस्थित होते.
