देवणी शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी इरफान पठाण तर अनु.जाती विभागाच्या युवक शहराध्यक्षपदी रितेश सूर्यवंशी
देवणी- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते देवणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी इरफान पठाण व अनु.जाती विभागाच्या युवक शहराध्यक्षपदी रितेश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे यांच्या सहीने ही नियुक्ती करण्यात आली.यावेळी पक्षाचे नेते देविदास पतंगे अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष लाला पटेल,मा.ग्रामपंचायत सदस्य रहिमखान खुरेशी, गणेश सूर्यवंशी,खयुम बागवान,इंटकचे माजी अध्यक्ष व्यंकटराव साळुंके हे उपस्थित होते.तर पुढे बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही,महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शरण पाटील,जिल्हा युवक काँग्रेसचे विजय निटूरे अध्यक्ष व निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे यांच्या यांच्या नेतृत्वात युवकाचे संघटन करून सध्याच्या राजकीय गोंधळात न पडता आपले नेते राहुल राहुल जी गांधी,राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुनजी खरगे,प्रांत अध्यक्ष नाना पटोले,यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी व मजबुतीसाठी आपण सर्व सामान्य युवकापर्यंत पक्षाचे ध्येयधोरणे राबवावे.व स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या धर्मनिरपेक्ष व सर्वसामावेशक विचाराचा प्रसार करावा असे ते म्हणाले.