अंगणवाडी मदतनिसचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक
शेळगीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले प्राथमिक शिक्षण
निलंगा/प्रतिनिधी
वडील गावातील पांडुरंग मंदिराचे पुजारी आणि आई अंगणवाडी मदतनिस असलेल्या निवृत्ती माने यानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.निलंगा तालुक्यातील शेळगी या गावात निवृत्ती माने यानी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून वडील शिवाजीराव माने गावातील पांडुरंग मंदिरात झाडलोट करून आपला उदरनिर्वाह चालवतात तर आई छायाबाई माने गावातीलच अंगणवाडी मध्ये तुटपुंज्या मानधनावर मदतनिस म्हणून काम करते.परंतु आई वडीलानी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवत निवृत्तीने पुणे येथे खाजगी औषधी दुकानात व लागेल ते काम करून आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केले असून तो महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याचे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने व संपूर्ण गावाच्या वतीने मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला व त्याचे कौतुक करण्यात आले आहे.यावेळी शेळगी गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.