• Fri. Jun 27th, 2025

सामाजिक संघटना व नुतन तहसिलदार यांच्या मध्यस्थीने विनोद कांबळे यांनी ऊपोषण सोडले

Byjantaadmin

Jul 7, 2023
सामाजिक संघटना व नुतन तहसिलदार यांच्या मध्यस्थीने विनोद कांबळे यांनी ऊपोषण सोडले
निलंगा. निटुर ता निलंगा येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद ऊत्तम कांबळे गेल्या चार दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यलय निलंगा येथे उपोषणास बसले होते!!त्यांची नाजुक झालेली तब्येत पाहुन ऊपोषन स्थळ पावसाच्या पाण्यामुळे पुर्ण जलमय झाले असल्याचे पाहुन निलंगा शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व नुतन तहसिलदार शृंगारे मॅडम या़च्याशी चर्चा करून सदरील शेतकर्यांची मागणी मान्य करण्याचे ठरले या साठी रस्ता करण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांचे संमती पत्र घेऊन  सदरील शेतकऱ्यास पेरणी साठी रस्ता देण्याचे ठरले या मध्यस्थी साठी.  अशोकराव पाटील मित्रमंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रा दयानंद चोपणे,  आरपीआय जिल्हा ऊपअध्यक्ष (A)  अंकुश ढेरे साहेब भटक्या विमुक्त संघटनेचे कत्तीकार विलास माने वंचित बहुजन आघाडी ता. महासचिव  देवदत्त सुर्यवंशी क्रांतीवीर लहुजी शक्ति सेना मराठवाडा कार्य अध्यक्ष  गोविंद सुर्यवंशी
 वंचित बहुजन कार्यकर्ते साहेबराव कांबळे तर प्रशासनाच्या वतीने  मंडळ अधिकारी गंदगे मॅडमनिटुर सज्जाचे तलाठी  आर बी  कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लिंबू सरबत देऊन ऊपोषन सोडण्यात आले  या वेळी ऊपोषन कर्त्याचे नातेवाईक आजी आजोबा  वडील व सामाजिक कार्यकर्ते लहु ढेरे, संदिप कांबळे, अजय कांबळे, अमित ढेरे  विलास कांबळे, अभय ढेरे , नचिकेत ढेरे, किरण कांबळे, विशाल कांबळे, धोंडीराम वाघमारे, व ईतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *