• Fri. Jun 27th, 2025

समृद्धी हायवे अपघाताच्या 12 तासानंतर यवतमाळमध्ये काय झालं? खळबळजनक माहिती समोर

Byjantaadmin

Jul 6, 2023

यवतमाळ,: समृद्धी महामार्गावर 30 जूनच्या मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला यवतमाळच्या एका पीयूसी सेंटरमधून प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्स पीयूसीसाठी यवतमाळमध्ये आलीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, धक्कादायक माहिती समोर

अपघात झालेल्या वाहनाची माहिती आम्ही काढली तेव्हा त्याची पीयूसी 10 मार्च 2023 पर्यंत होती, त्यानंतर बघितलं असता पीयूसी अपडेट केलेली होती. त्यानंतर आम्ही पीयूसी सेंटरला नोटीस पाठवली आहे, वाहन मालकालाही नोटीस पाठवली आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे. घटना 30 च्या रात्री म्हणजे 1 तारखेला झाली आहे आणि पीयूसी त्यांनी 10 वाजून 38 मिनिटांनी काढली आहे, यवतमाळच्या रॉयल पीयूसी सेंटरमधून ही पीयूसी काढण्यात आली आहे, अशी माहिती यवतमाळचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे.

या अपघातानंतर बस ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. अपघात टायर फुटून झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली. यावेळी डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे. समृध्दी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसऱ्या लेन मधून जाणं अपेक्षित असतानाही बस दुभाजकावर आदळली. याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत नागपूर ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *