मुंबई, : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. दरम्यान अजित पवारांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शरद पवारांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यातच आता मराठवाड्यातील आमदारांच्या नावाची यादी समोर आली आहे. यातील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
मराठवाड्यातील कोणत्या आमदाराचा कोणाला पाठिंबा?
जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे हे शरद पवार यांना भेटायला जातो म्हणून मुंबईला रवाना झाले आहेत.
बीड जिल्हा
परळी – धनंजय मुंडे – अजित पवार
बीड- संदीप क्षीरसागर- शरद पवार
पाटोदा- बाळासाहेब आजबे – अजून भूमिका कळू शकली नाही
माजलगाव- प्रकाश सोळंके -अजित पवार
लातूर-
अहमदपूर- बाबासाहेब पाटील- अजित पवार
उदगीर- संजय बनसोडे – अजित पवार
हिंगोली
वसमत – राहुल नवघरे – शरद पवार
सतीश चव्हाण – अजित पवार
विक्रम काळे -अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित