• Sun. Jun 29th, 2025

लातूरची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत

Byjantaadmin

Jul 2, 2023

पहाटेच्या शपथविधीच्या वेळी केलेले बंड फसल्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा बंड पुकारले. तीसहून अधिक आमदार सोबत असल्याचा दावा करत अजित पवारांनी आज दुपारचा शपथविधी यशस्वी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  यावेळी त्यांच्यासोबत शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनेक ज्येष्ठ नेते असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

मराठवाड्याचा विचार केला तर पुर्वीच्या बंडाप्रमाणेच यावेळीही अजित पवारांना साथ मिळाल्याचे चित्र आहे LATUR जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी उदगीर आणि अहमदपूर या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. NCP की उदगीरचे माजी मंत्री संजय बनसोड यावेळीही अजित पवारांसोबत दिसले.ज्या अजित पवारांमुळे आमदारकी आणि पहिल्याच फटक्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले, त्या पवारांची साथ त्यांनी सोडली नाही. MARATHWADA अजित पवारांनी देखील संजय बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवत ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये त्यांना स्थान दिले.दुसरे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे देखील अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. ते देखील अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. त्यामुळे ते देखील अजित पवारांसोबतच असल्याचे स्प्ट झाले आहे.मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीची फारशी ताकद आणि आमदार देखील नाहीत. तर हिंगोली जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील अजित पवारांसोबतच असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी स्वतः फोन करून त्यांना कालच मुंबईत बोलवून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *