शोले स्टाईल आंदोलन करुन आंदोलनाला अशोकराव पाटील निलंगेकारांचा जाहीर पाठींबा!
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी):-1966 साली कर्मयोगी.स्व.डाँं.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या संकल्पनेतुन व दुरदृष्टीतुन घरणी मध्यम प्रकल्पाची र्निमीती व पायाभरणी झाली त्याच घरणी मध्यम प्रकल्पातुन पाणी पाईपलाइनच्या माध्यमातून लातुर शहरालगत असलेल्या महाराणा प्रताप नगर गावाला घेऊन जात असलेले अनाधिकृत काम कायमचे बंद करुन तात्काळ या कामाची निवीदा रद्द करावे यासाठी शिरूर अनंतपाळ शहरात गेल्या 6 दिवसांपासून धरणे आंदोलन,रस्ता रोको आंदोलन,अन्नत्याग आंदोलन चालू आहे. मा.अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत आरी मोड बेटावरील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करुन आंदोलनाला अशोकराव पाटील जाहीर पाठींबा दिला
यावेळी विठ्ठलराव पाटील शेंदकर,संजय बिराजदार,नगरसेवक. सुधीर लखनगावे,सुरज चव्हाण,प्रा.सुरेंद्र धुमाळ,पंकज शेळके,लक्ष्मण बोधले,गंगाधर चव्हाण,अनिल देवंगरे,अपरिजीत मरगणे,रामकिशन गड्डीमे,महेश देशमुख,बबन होनमाने,ओम जगताप,प्रा.दयानंदआण्णा चोपणे,लालाभैय्या पटेल,गोविंद सुर्यवंशी,केदार लोंढे,औदुंबर शिंदाळकर,संदीप धुमाळे,अमोल दुरुगकर,रवी धुमाळ यांच्यासह यावेळी नागेवाडी,कारेवाडी,दगडवाडी,बोळे गाव,लक्कडजवळगा, आरी, रापका, शिवपुर,कांबळगा, शिरुर अनंतपाळ आदी गावासह तालुक्यातील हजारो ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.