माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
सामजिक विकासात्मक विषयांवर झाली चर्चा
लातूर ;राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आशियाना बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली यावेळी शहरातील विविध सामाजिक विकासात्मक विषयांवर चर्चा केली यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात आला
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुतळा परिसर सुशोभित करणे, शहरातील वाहतूक समस्या, टिव्हिशन एरिया मध्ये दररोज होत असलेल्या समस्या, तसेच विविध विषयांवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सोबत चर्चा करण्यात आली त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिलीपरावजी देशमुख यांच्या कडून देण्यात आला कृषी बाजार समितीच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच बाजार समितीच्या वतीने होत असलेले वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर मार्गक्रमण होत असून त्याबद्दल आदरणिय साहेब यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे डॉ हर्षवर्धन राउत, हंसराज जाधव डॉ अभय कदम, डॉ रमेश भराटे , विक्रम माकनिकर, मनोज पाटील, डी एस पाटील, धनंजय शेळके, अँड विजय जाधव, विजय औंढे, भगवान माकणे, राजकुमार जाधव, सुनिल सुर्यवंशी प्रमोद साळुंखे, दिनेश जाधव , सचिन दाताळ, शहाजी पवार, डी. एस. पाटील, अविनाश पाटील, मुकेश राजमाने आदी उपस्थित होते.