• Fri. May 2nd, 2025

चन्नबसवेश्वर ‘ ची वैष्णवी काळे अंतिम वर्षात तर परवीन शेख प्रथम वर्ष डी. फार्मसीत राज्यात प्रथम

Byjantaadmin

Jul 1, 2023

लातूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात
आलेल्या औषध निर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) परीक्षेत लातूरच्या चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या महाविद्यालयाची वैष्णवी काळे हिने अंतिम वर्षात तर परवीन शेख हिने प्रथम वर्ष डी. फार्मसीत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
वैष्णवी रामदास काळे हिने डी. फार्मसीच्या अंतिम वर्षात ८९. ६४ टक्के गुण मिळविले आहेत. तर परवीन शेख हिने प्रथम वर्ष डी.फार्मसी परीक्षेत ८८. ६० % टक्के गुण प्राप्त केले आहेत.
यानिमित्ताने चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे शैक्षणिक क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्यानवीन अभ्यासक्रम ई-आर २०२० मधील पहिलाच निकाल मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला असून, त्यात वैष्णवी काळे हिने मिळवले यश विशेषगौरवास्पद आहे. अंतिम वर्ष डी . फार्मसी चा सरासरी निकाल ९५. ३४ टक्के असून ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० असून प्रथम श्रेणी मध्ये २२ विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. प्रथम वर्ष डी फार्मसी परीक्षेमध्ये परवीन हमीद शेख ८८. ६० टक्के गुण प्राप्त करुन राज्यातून प्रथम तर केतकी गणेश बेजगमवार हिने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान मिळवले आहे. वैष्णवी बाबुराव घोडके हिने ८२ टक्के गुण मिळवत महाविद्यालयामध्ये तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. प्रथम वर्ष डी . फार्मसी चा सरासरी निकाल ८० टक्के असून ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० असून प्रथम श्रेणी मध्ये २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष डी. फार्मसी ची प्रवेश प्रक्रिया विलंबाने चालू झाली ज्यामुळे प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांना केवळ पाच महिन्यातच परीक्षाला सामोरे जावे लागले त्यामुळे संपूर्ण राज्यातील फार्मसी संस्थेला अनेक शैक्षणिक अडचणीला सामोरे जावे लागले त्यामुळे एकूणच फार्मसी च्या निकालावर विपरीत परिणाम झालेला आहे. या परिस्थितीत देखील चन्नबसवेश्वर च्या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश प्राप्त केले. पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्ट संचलित चन्नबसवेश्वर शैक्षणिक संकुलामध्ये डी. फार्मसी , बी .फार्मसी ,एम. फार्मसी ( Pharmaceutics, Quality Assurance , Pharma. Chemistry, Pharmacology, ) फार्म. डी विनाअनुदानित डी .फार्मसी हे अभ्यासक्रम राबविले जातात . त्यासोबत कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीतून समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रनिकेतनच्याlमाध्यमातून सामूहिक विकास योजना ही केंद्र सरकार भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने प्रभावीपणे राबविली जाते . या संस्थेस पी . एच .डी . रिसर्च सेंटरची मान्यता असून ज्या द्वारे संशोधनाचे कामकाज पूर्ण करत आहेत . संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या विना अनुदानित डी . फार्मसी तुकडीतील विध्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केले आहे. यातील कु. सय्यद मेहजाबीन कलीम हिने ८६. ६२ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम व मराठवाड्यातून द्वितीय तर पाटील आशिष जाधव द्वितीय ,आणि प्रथम वर्षाची पटेल आफिया ८३ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून पप्रथम तर सुमय्या गोलंदाज ७८ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे . करोना १९ च्या जागतिक महामारी च्या दरम्यान सर्व अभ्यासक्रमाच्या च्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. करोना वर यशस्वी मात केल्यानंतर मार्च २२ नंतर सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. ऑनलाईन पद्धती च्या वेळी विद्यार्थ्यांचा सादरीकरणाचा, लिहिण्याचा सराव हा खंडित झाला होता. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. संजय थोंटे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या अनेक लेखी सराव परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात आल्या. याचा फायदा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेमध्ये झाला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे निर्देशीत नवीन परीक्षा पद्धतीमध्ये multiple choice वरती आधारित २० मार्कच्या प्रश्नाचा समावेश या वर्षांपासून करण्यात आला आहे . परंतु चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज मध्ये २०१५ पासून प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिक वर आधारित multiple choice प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातात. या निकालामुळे नवीन अभ्यासक्रमानुसार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे फार्मासिस्ट नोंदणीसाठी भविष्यात होणाऱ्या फार्मसी एक्सिट परीक्षेसाठी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास उंचावण्यात मदत झाली आहे. या कॉलेजचे डी .फार्मसी चे विद्यार्थी दरवर्षी राज्यस्तरावर, विभागीयस्तरावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतात. कॉलेजच्या या आगळ्यावेगळ्या सुत्रामुळे चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजने आदर्शवत लातूर फार्मसी पॅटर्न तयार केला आहे. याची नोंद व अनुकरण राज्याच्या कानाकोपऱ्यांत केले जाते. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक डी. फार्मसी कॉलेजचे शैक्षणिक आवेक्षण केले जाते, या दरम्यान महाविद्यालयांमध्ये उपलब्ध सोयी सुविधा, महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, निकालाची सरासरी याची सखोल तपासणी केली जाते . सदरच्या आवेक्षणमध्ये चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजला सातत्याने अतिउत्कृष्ट शेरा देऊन गौरविले जाते. यावर्षीच्या डी. फार्मसी चा निकाल च्या माध्यमातून चन्नबसवेश्वर च्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा परत एकदा रोवला गेला. ह्यावर्षीच्या दर्जेदार निकालामुळे लातूरच्या फार्मसीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आनंद व्यक्त होत
आहे. सर्व गुणवंत विद्यार्थिनी, विद्यार्थी यांचा सत्कार पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर, संचालक विजयकुमार मठपती] ,अरुण हलकुडे, डॉ. अशोक सांगवीकर, अनुप देवणीकर, प्राचार्य डॉ. संजय थोंटे ,डॉ. विजयेंद्र स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक समन्यवयक प्रा. प्रताप भोसले प्रा. रवि राजूरकर, प्रा. बसवराज सुगावे, प्रा. रामलिंग सुगावे, प्रा. दत्ताहरी कवडेवार , प्रा . सुनील हिंडोळे ,प्रा.गंगासागर कर्डिले, प्रा . प्रशांत बनसोडे , प्रा .स्वस्तिका चामे , प्रा . रोहित कोंबडे, प्रा . आरती जयशेट्टे, प्रा . वैष्णवी मुगळे , प्रा . सुजाता भोसले कार्यालयीन अधिक्षक शिवहार विभुते,ग्रंथालय प्रमुख प्रदीप रामेगावकर , अमोल सोनकांबळे ,सिद्धेश्वर स्वामी, ईश्वर डोंगरे, विशाल निलंगेकर , धनराज स्वामी ,गुरुलिंग पिचे , शारदा स्वामी , अरुण स्वामी , युवराज खुणे ,सिद्धेश्वर वैरागकर ,शिवसांब राचट्टे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *