• Fri. Jun 20th, 2025

रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातुर आर्यावृत व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्तविद्यमाने आषाढी एकादशी निमित्त भजन संध्या

Byjantaadmin

Jul 1, 2023

latur आनंद वारी या निमित्त रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातुर आर्यावृत व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्तविद्यमाने आषाढी एकादशी निमित्त भजन संध्या व सांप्रदायिक भजन , पाउले , फुगडीचा आनंद बाल वारकरी, रोट्रॅक्टर व इनरह्वील क्लबच्या सदस्यांनी घेतला. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषात सर्वांनी पाउलांचा ठेका घेतला. तसेच दोन्ही क्लब च्या वतिने हभप छाया ताई वेळापुरे व हभप सविता ताई शिंदे यांचा संन्मान केला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सौ शोभाताई पाटिल (मनपा नगरसेवक) यांचाही सन्मान आदित्य शास्त्री व सुरेखा भारती व सौ शीतल गड्डिमे  व काकासाहेब सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रोटरी क्लब चे संचालक श्री शामसुंदर मानधना सर व रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातुर आर्यावृत चे सल्लागारडॉ संजय जोगदंड सर यांचाही सन्मान दोन्ही क्लब च्या वतिने करण्यात आला. तसेच डॉ मैहंदरकर मॅडम यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातुर आर्यावृत ला औषधांचा बाॅक्स भेट दिला. व पुढेही मदत करु है आश्वासन दिले.तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अध्यक्ष आर्यावृत आदित्य शास्त्री, सचिव काकासाहेब सुरवसे   नुतन कोषाध्यक्ष विशाल शिरोळे , प्रकल्प प्रमुख प्रा शुभम पाटिल , मयुर रत्नपारखे, सागर भिसे, डॉ नेहा हीरेमठ  , डॉ संजय जोगदंड, शामसुंदर मानधना, आचार्य चंद्रहासजी शास्त्री, मिनाक्षी शास्त्री, परमेश्वर पवार नितिन चेंडके , मोटे सर व  इनरह्वील क्लब अध्यक्ष सौ सुरेखा भारती, सचिवा सौ शीतल गड्डिमे, सौ सारिका गांधी, अनुराधा बेळंबे , डॉ वर्षा मैहंदरकर, मनीषा पुरी, ऋतुजा देशमुख, स्नेहा देशमुख, प्रीतम जाधव , ज्योती वर्मा, शीला यादव , रेशमा बोरा, डॉ स्मिता वाडे ,सुनीता आग्रोया, सुचिता सूर्यवंशी, अनुराधा सोमाणी, चंद्रकला भार्गव मॅम , संध्या चोधरी, अंकिता कोटलवार , धनश्री जाधव  तसेच महिला भजनी मंडळ लता सनगले, पार्वती शिवनगे, तळेकर , वाले, बंडगर बबलु, ज्योती खेकडे, मुंडे , येरटे, मिटकरी, छाया वेळापुरे , स्वामी, सविता शिंदे , माताजी, इत्यादि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *