मारिया पोतदार लर्न स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा
निलंगा (प्रतिनिधी):-आज रोजी शुक्रवार, ३०/०६/२०२३ निलंगा येथे मारिया पोतदार लर्न स्कूल आयोजित आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आज सर्व विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेमध्ये शाळेत आले होते. आमच्या शाळेतील चिमुकल्याने सर्व निलंगेकरांचे डोळ्याचे पारणे फिटेल अश्या विविध कलाकृतीचे सादरीकरण केले. जसे की लेझीम, पाऊले गीत गायन, फुगडी व नृत्य सादर करण्यात आले. सर्व निलंगा वाशियाने आमच्या बालकांच्या कलाकृतीला प्रचंड प्रतिसाद दिला. हा दिंडी सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ चौकापासून सुरू करण्यात आला व कुटुंबले हॉस्पिटल येथे या दिंडीची सांगता करण्यात आली. सर्व पोलीस यंत्रणेने आम्हाला योग्य मदत व मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज काणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदांनी व इतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.