• Mon. Apr 28th, 2025

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते आदर्श  मैत्री फाउंडेशन ”समाजसेवा रत्न ”पुरस्काराने सन्मानित

Byjantaadmin

Nov 2, 2022
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते
आदर्श  मैत्री फाउंडेशन ”समाजसेवा रत्न ”पुरस्काराने सन्मानित
लातूर:- सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आदर्श मैत्री फाउंडेशन ला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने अनेक वर्षा पासून सातत्याने वंचित घटकांच्या दीपावली साठी पेपर रद्दी संकलनामधून जवळपास २५० कुटुंबास  दीपावली फराळ,अभयगंस्नान किट, साड्या चे वाटप करून त्यांची दीपावली गोड करण्याचे काम केले जाते.  कोविड कालावधी मध्ये फेस शिल्ड, मास्क व स्यनिटायजर चे वाटप, शिवाय महाराष्ट्रात सर्वप्रथम अन्न-धान्य किट वाटप ची संकल्पना  आदर्शमैत्री फाउंडेशन ने राबवली. दरवर्षी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य, २ लाखा पेक्षा  जास्त रजिस्टरचे वाटप, देशाच्या ७५ रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त ७५ विध्यार्थी  दत्तक , विध्यार्थ्यासाठी सायकल बँक उपक्रम ,रक्तदान, आरोग्य शिबिराचे आयोजन, जनजागृती साठी नामांकित व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन, वृदाश्रम , एच आय वी बाधित साठी भरीव कार्य ,                                   कोविड कालामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता प्रत्यक्षात फिल्ड वर काम करणाऱ्या शासकीय हॉस्पिटल मधील नर्स (सिस्टर) यांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा करून त्यांना शॉल साडी , मिठाई भेट देऊन त्यांचा सन्मान करणे  या सारखे अनेक आदर्श सामाजिक उपक्रम राबवल्याची दखल घेऊन सप्त फेरे वधुवर सूचक  केंद्राचे संचालक संजय राजुळे व निवड समितीने आदर्श मैत्री फाउंडेशनची ”समाजसेवा रत्न ” पुरस्कारासाठी निवड केली व केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, लातूर चे माझी  पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,गुरुनाथ मजगे , प्रेरणा होनराव ,धर्मवीर भारती आदी मान्यवरांच्या हस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार ,संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर ,तुकाराम पाटील ,शशिकांत पाटील प्रा.निलेश राजेमाने ,अड.दासराव शिरूरे,विवेक सौताडेकर , ओम प्रकाश झुरळे , अशोक तोगरे, पप्पू बाहेती , कमलाकर शिनगारे ,यादव , संपत जगदाळे , राघवेंद्र इटकर , तेजस शेरखाने, नागनाथ आगवणे आदींच्या उपस्तितीत ” समाजसेवा रत्न ” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
      या पुरस्कारामुळे समाजात आणखी आदर्श काम करण्याची प्रेरणा मिळाली असून या पुरस्काराचे सर्व श्रेय फाउंडेशनचे सर्व संचालक व आमच्या प्रत्येक उपक्रमास प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पणे सहकार्य करणाऱ्या सर्व मित्र परिवारास जाते असे मत यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed