• Mon. Apr 28th, 2025

सप्तफेरेचे विवाह कार्य, सामाजिक कार्य हे समाजासाठी उपयोगी: माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Nov 2, 2022

केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या उपस्थितीत सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

सप्तफेरेचे विवाह कार्य, सामाजिक कार्य हे समाजासाठी उपयोगी: माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

लातूर :- सप्तफेरे वधु वर सुचक केंद्राच्यावतीने सामाजिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेऊन विविध कार्यात मोलाचे योगदान देणार्‍या कर्तुत्वान, गुणवान सामाजिक कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा गेल्या दहा वर्षापासून करण्याचे कार्य सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून केले जाते. त्याचप्रमाणे रविवार दि. 30 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता हा कार्यक्रम स्वानंद मंगल कार्यालय, छत्रपती चौक, लातूर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.भगवंत खुब्बा केंद्रीय रसायन, खते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जास्रोत राज्यमंत्री (भारत सरकार) यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आ.संभाजी पाटील निलंगेकर माजी पालकमंत्री तथा आमदार निलंगा तसेच कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून गुरुनाथ मगे लातूर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, प्रा.प्रेरणाताई होनराव प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवराज मोटेगावकर संस्थापक आरसीसी, डॉ. राजेश दरडे वैष्णवी एन्डोस्कोपी सेंटर, डॉ. धर्मवीर भारती क्रेडाई, महाराष्ट्र समन्वय, प्रा.धोंडीबा आंबेगावे अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, आदि मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्याबद्दल ज्यांचा गौरव करून पुरस्कार दिला गेला त्यामध्ये श्रीमती.गंधाराबाई सकट-स्वच्छता रत्न पुरस्कार, किशनराव पाटील इंचूरकर-जीवनगौरव पुरस्कार, माऊली ब्लड बँक-आरोग्य रत्न पुरस्कार, साथ फाउंडेशन-सेवारत्न पुरस्कार, अर्पण फाउंडेशन-समाज रत्न पुरस्कार, किरण एस.साकोळे-शिक्षण रत्न पुरस्कार, धनराज परशने-समाज रत्न पुरस्कार, नागनाथ गीते-उद्योग रत्न पुरस्कार, ड.सुजाता माने(केंद्रे)- नारीरत्न पुरस्कार, आदर्श मैत्री फाऊंडेशन-समाजसेवा रत्न पुरस्कार, अजित फाऊंडेशन-विशेष सेवारत्न पुरस्कार, डॉ.व्यंकटरावजी कोळपुके-साहित्यरत्न पुरस्कार, गोविंद लोखंडे-कोरोंना योद्धा पुरस्कार, माझे लातूर परिवार-लातूर रत्न पुरस्कार. या सर्वाना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.ङ्गया प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रजल्वनाने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले. तर आयोजक संस्थापक संजय राजुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर मीरा ताई यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मा.आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी बोलताना लातूर ही ज्ञानाची व प्रेरणेची खाण आहे व सप्तफेरेकडून होत असलेले कार्य हे एक याचेच उत्तम उदाहरण आहे असे मत व्यक्त केले. व समाजिक कार्यात मध्ये काहीही मदत व सोबत काम करण्यासाठीची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.खा.भगवंत खुब्बासाहेब यांनी पन आपले विचार मांडले या मध्ये त्यांनी सप्तफेरे कडून होत असलेले काम लक्षणीय आहे आज काल मानव हा मी व माझे यात गुंतला आहे पन त्यापुढचा विचार करत सप्तफेरेचे विवाह कार्य, सामाजिक कार्य हे आजच्या काळात अभूतपूर्व आहे व हे फक्त समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ असणारेच लोक करू शकतात. व हे भविष्यात हे काम आणखी मोठ्या प्रमाणात व्हावे ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यानंतर श्री उमेश खोसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगत केली.
तर कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 चे संयोजक प्रमोद लिंगशेट्टी पाटील, रवीकरण सुर्यवंशी, दत्तात्रेय परळकर, लहुजी शिंदे, बालाजी पिंपळे, गंगाधर डिगोळे, विद्यासागर पाटील, लोमटे सर, ड.जितेंद्र पाटील, जितेंद्र सराफ, पत्रकार अनिल पुरी, रामदास माने, संभाजी तांदळे, भालचंद्र गुरव, योगानंद जोशी, संतोष सोनवणे, मुक्ताई पतसंस्था, देविका शिवपुजे, महादेव मद्दे, सिद्धेश्वर चलवदे, नीता खेडकर, चंद्रकला कासराळे, मंचक रंडाळे, राम मोहिते, गणेश साखरे, बसवराज पटणे, मनोज पटवारी, आदिनाथ कोरे, गुरुनाथ माळेवाडे, राजकुमार चलवा, अजय चलवा, संजय रोडगे, महादेव खिचडी, काकासाहेब गुट्टे, अमोल घायाळ, राम रोडगे, विरभद्र तरगुडे, भगवान सांगवे, चेतन पाटील, रामराजे काळे, सुनील ईबीतदार, विष्णुदास कळसे, भागवत भोसले, कैलास शिंदे, दिगंबर सगरे, ब्रह्मानंद आचार्य, प्रदीप आचार्य, रवी गुरदाळे, केशव येदले, सुरेश पवार, आकाश पाटील, गोपाळ सांगवे, नितीन जाधव, अभिजीत सोमवंशी, गणेश पाटील, डॉ.साईनाथ क्यादरकून्टे तर सूत्रसंचालन गणेश परळे व पल्लवी ताई हाके आदींचे सहकार्य लाभले. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, संयोजक समिति या सर्वांचे मनपूर्वक आभार आयोजक सप्तफेरे वधु-वर सुचक चे संस्थापक संजय राजूळे व संचालक माधव तरगुडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed