Buldhana Accident :येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 25 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे वृत मन हेलावणारे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारनं अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी ही भीषण घटना घडली. या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 300 हून जास्त प्रवासी मरण पावले आहेत. सरकारनं अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला.हे वृत्त मन हेलावणारे आहे .गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत . आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले .सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) July 1, 2023
बस विदर्भ ट्रॅव्हल्सची
अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.
राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची तर केंद्राकडून दोन लाखांची मदत जाहीर
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. तर यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच केंद्र सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.