• Wed. Apr 30th, 2025

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर झाड कोसळले, API सह चालकाचा मृत्यू; 3 पोलीस जखमी

Byjantaadmin

Jul 1, 2023
जळगावमध्ये पावसाचा तडाखा बसल्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली कोसळली आहे. पाऊस सुरू असताना झाड पडल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offence Wing / EOW) वाहनाचे नुकसान झाले. या दुर्घटनेत आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाला आणि 3 पोलीस जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडली.
Jalgaon : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर झाड कोसळले, API सह चालकाचा मृत्यू; 3 पोलीस जखमी
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पिलखोड येथे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक गेले होते. हे पथक परत येत असताना एरंडोल-कासोदा परिसरात होते त्यावेळी दुर्घटना घडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळले. ही दुर्घटना अंजनी धरणाजवळच्या रस्त्यावर घडली. वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. झाड कोसळल्यामुळे गाडीत बसलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि वाहन चालक अजय चौधरी या दोघांचा घटवास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत वाहनात बसलेले 3 पोलीस जखमी झाले. सर्व जखमी पोलिसांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दुर्घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *