लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैैठकीत
संघटन बांधणी व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त चर्चा
लातूर,; उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा २७ जुलै रोजीचा वाढ दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यासोबतच पक्षा संघटन बांधणीसंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत चर्चा करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ जून २०२३ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख,शहर महानगर प्रमुख, शहर तालुकाप्रमुख, शहर संघटक, तालुका संघटक, विधानसभा प्रमुख,शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपशहर प्रमुख,विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकार्यांची बैठक झाली.यावेळ जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शहर विधानसभेमध्ये संघटनात्मक बांधणी व २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करणे बाबत व शिवसेनेच्या वतीने नेत्र चिकित्सा आरोग्य शिबीर राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा मार्गदर्शक सी. के. मुरळीकर,उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, महानगर प्रमुख विष्णूपंत साठे,विधानसभा प्रमुख एस.आर.चव्हाण, तालुका प्रमुख बाबुराव शेळके,शहर प्रमुख रमेश माळी, शहर प्रमुख सुनील बसपुरे,विधानसभा समन्वयक युवराज वंजारे, शहर संघटक राजेंद्र कतारे,युवासेना जिल्हा समन्वयक महेश साळुंखे,युवासेना चिटणीस संतोष माने, उपशहर प्रमुख रोहित दोपारे,उपशहर प्रमुख शिवराज मुळावकर,उपशहर प्रमुख राहुल रोडे, विभाग प्रमुख बाळू दंडिमे,विभाग प्रमुख प्रदीप उपासे, विभाग प्रमुख महेश चांदणे,विभाग प्रमुख सिद्धेश्वर जाधव,ज्ञानेश्वर मोरे,हिरालाल साबळे,प्रवीण जाधव, उपस्थित होते.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैैठकीत संघटन बांधणी व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त चर्चा
