ज्ञानप्रकाशने विद्यार्थ्यांत गुणवत्तेबरोबरच सामाजिकता रुजवली डॉ.अजय देवरे ( Dy sp, लातूर)
latur आज ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात 10 वी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.डॉ. अजय देवरे ( अतिरिक्त,जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर) व श्री.मिलिंद माने ( उपप्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर) तसेच ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रकल्पप्रमुख श्री.सतीश नरहरे , मुख्याध्यापिका व संचालिका सविता नरहरे यांची उपस्थिती होती.
10 वी शालांत परीक्षेसाठी एकूण 84 विद्यार्थी बसले होते. त्यातील 51 विद्यार्थ्यांनी 90% हुन अधिक गुण मिळविले. तर 85% पेक्षा अधिक गुण 11 विद्यार्थ्यांनी घेतले. या सर्व 84 विद्यार्थ्यांचा गुणगौरव पाहुण्यांच्या हस्ते झाला.यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलताना श्री.डॉ.अजय देवरे म्हणाले, ज्ञानप्रकाश प्रकल्पात केवळ मुलांच्या गुणवाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यासोबत मानवी मूल्य सहजतेने रुजतील याकरिता प्रयत्न केले जातात. प्रकल्पाच्या सांघिक प्रयत्नामुळे या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेबरोबरच सामाजिकता रुजली आहे. पुढे बोलताना डॉ. देवरे म्हणाले, पालकांनी मुलांना पैशाची मशीन म्हणून न बघता सुजान नागरिक म्हणून बघावं. मुलांनी ही करिअर निवडताना त्याची आवड काय, त्याला कशात आनंद मिळतो व त्याला जमेल काय या गोष्टीचा विचार करून क्षेत्र निवडावे असे ते म्हणाले.यावेळी डॉ. मिलिंद माने सर मुलांशी संवाद साधताना म्हणाले, पुस्तकी ज्ञानासाठी शिक्षण न घेता आपल्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आणि प्रेरक शिक्षण घ्यावं.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख श्री. सतीश नरहरे यांनी केले. त्यांनी प्रकल्पात केलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.पालक प्रतिनिधी म्हणून श्री.संजय मगर यांनी प्रकल्पाच्या मुक्त वातावरणाचा मुलांच्या विकसनावर चांगला परिणाम होतो अशी भावना व्यक्त केली.आई पालक प्रतिनिधी सौ. नंदिनी पुजारी यांनी येथील वसा आणि वारसा गुरूपरंपरेचा आहे असा दृढ विश्वास व्यक्त केला.कु. अनुष्का बिरादार हिने शाळेप्रति असलेल्या भावनेना वाटा मोकळी करून दिली. 10 वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासोबतच neet व jee राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते शुभेच्छापत्र ,सन्मानचिन्ह , फुल व पुस्तक देऊन सन्मान केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुचेता चाकूरकर व हेमा येचवाड यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक अशोक गुरदाळे, सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.