माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रभाग १५ प्रभाग १७ मधील पदाधिकारी व नागरीकांच्या मागणीची घेतली दखल
रस्ते व नालीबांधकाम लवकरच होणार सुरू
लातूर प्रतिनिधी : बुधवार २८ जून २०२३ :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना पाऊस पडल्यावर प्रभाग १५ व प्रभाग १७ मध्ये रस्त्यावर पाणी साठले आणि नागरीकांना येजा करण्यासाठी अडचण होत असल्याची माहीती देण्यात आली. ही माहीती मिळताच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दखल घेऊन तातडीने लातूर मनपा आयुक्त आणि संबंधित यंत्रणेला याबाबत सूचना केल्या.लातूर मनपाकडून कार्यवाही त्या भागात आजच जाऊन स्थळ पाहणी करून, रस्ते व नाली बांधकाम करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. लातूर शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. या पावसात प्रभाग १५ व प्रभाग १७ मधील जुनी आदर्श कॉलनी, सुमन स्कुल, प्रभा वृध्दाआश्रम रोड येथे पाणी वाहून जाण्यास अडथळा येऊन रस्त्यावर पाणी साठले. यामूळे नागरीकांना येजा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. प्रभाग १७ चे अध्यक्ष प्रविण घोटाळे व प्रभाग १५ चे अध्यक्ष राजकूमार जाधव आणि प्रभागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही अडचण राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे मांडली आमदार देशमुख यांनी याची तातडीने दखल घेऊन. लातूर मनपा आयुक्त आणि संबंधित यंत्रणेला याबाबत सूचना केल्या. लातूर मनपाकडून प्रभाग १५ व प्रभाग १७ मधील या भागाची मनपा नगर अभियंता केंद्रे, सुपरवायझर जाधव, व रामकिशन कांबळे यांनी स्थळ पाहणी केली, यानूसार रस्ते बांधकाम, नाली बांधकाम व खडडे बुजवीण्यासाठी अंदाजपत्रक
तयार करून सदरील कामास प्राधान्याने मंजूरी देण्यात आली आहे. यामूळे प्रभाग १५ व प्रभाग १७ मधील या कामास लवकरच सुरूवात होत आहे.