संपूर्ण मराठवाड्यातून द्वारकादास शामकुमारच्या वतीने
२३ बसेसमधून भाविकांना मोफत पंढरीची वारी
लातूर : द्वारकादास शामकुमार वस्त्र दालन समूहाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही संपूर्ण मराठवाड्यातून एकूण २३ बसेसच्या माध्यमातून भाविकांना मोफत पंढरीची वारी घडविण्यात आली. लातूरसह उदगीर, अहमदपूर,अंबाजोगाई,छत्रपती संभाजीनगर येथील शाखांमधून या गाड्या सोडण्यात आल्या. त्यात पाच बसेस लातूर शहरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आल्या.
लातूरच्या अंबाजोगाई रोडवरील द्वारकादास श्यामकुमार वस्त्र दालनात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अविनाश देवशेटवार, डॉ. अजय जाधव, प्राचार्य महादेव गव्हाणे, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, रवींद्र अग्रवाल, माजी नगरसेविका रागिणी यादव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तुकाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. पंढरीला जाणाऱ्या सर्व स्त्री – पुरुष भाविकांचा तसेच बसच्या चालक – वाहकांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी भाविकांना प्रतिवर्षी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडविणारे तुकाराम पाटील यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असल्याचे सांगितले. नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व सातत्याने काही ना काही वेगळे करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. वारकऱ्यांना विठूरायाचे दर्शन घडविल्यास अनंत जन्माचे पुण्य लाभते असे म्हटले जाते. या रूपाने तुकाराम पाटलांनीही अनेक जन्माचा पुण्याचा साठा संकलित केल्याचे गौरवोदगार गोजमगुंडे यांनी काढले. सर्व भाविकांना त्यांना पंढरीच्या या वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करताना वारीच्या या अनोख्या सोहळ्याने आपल्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. आपली आजी दरवर्षी पंढरीच्या वरील जायची. तिच्यामुळे आपल्यालाही लहानपणी पंढरीची वारी करण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या पसायदानाची महती नमूद करून त्यांनी भाविकांना वारीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अविनाश देवशेटवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नवघरे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक सौताडेकर यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य निलेश राजमाने, रमेश बिरादार, मुकेश राजमाने,भिकाने, शशिकांत पाटील, इस्माईल शेख, निशांत भद्रेश्वर,प्रा. किर्तने , प्रा. सच्चीदानंद ढगे , प्रा. विवेकानंद ढगे , एड. चिताडे, एड. दासराव शिरूरे , प्रमोद भोयरेकर,असिफ शेख,सुजित बिरादार, श्रीकांत राऊत, बालाजी शिंदे, बालाजी जाधव,संतोष बिराजदार, सुदाम पवार, ज्ञानेश्वर माने, अमोल चामे,नितीन खोत यासह तुकाराम पाटील मित्र परिवारातील सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२३ बसेसमधून भाविकांना मोफत पंढरीची वारी
