लोदग्यातील फिनिक्स फाऊंडेशनला कृषी पदवी अभ्यासक्रमाची मान्यता ;प्रवेश चालू,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी
औसा;- औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनिक्स फाऊंडेशन शैक्षणिक संकुलात आणखीन एक अभ्यासक्रमाची भर पडली.यात राज्याचे कृषीमंत्री,कृषीतज्ञ, महाराष्ट्र राज्य कृषी परिषद व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या शिफारशी नुसार फिनिक्स फाऊंडेशन मध्ये यंदापासून कृषि पदवी (B.Sc. Agri ) या चार वर्षाच्या अभ्यासक्रम महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे.कृषि क्षेत्रात व्यावसायिक संधी व करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी निर्माण झाली.यासह मा. कृषि मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या विशेष प्रयत्नाने 1 लि ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रम अनिवार्य केल्याने या क्षेत्रात पदवी घेणाऱ्यांना शिक्षक होण्याचीही नामी संधी मिळणार आहे.
औसा तालुक्यात प्रथमच मा.आ.पाशा पटेल यांच्या प्रयत्नाने कृषि पदवी अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवळच शिक्षणाची सवलत मिळावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी दुरदृष्टी ठेवून लोदग्यातील महाविद्यालयात वरील अभ्यासक्रमाला मान्यता दिली.याचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर उपलब्ध आहे.२४ जून ते ९ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.लोदग्यातील फिनिक्स फाऊंडेशन मध्ये अद्यावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राध्यापक वर्ग, टिशू कल्चर प्रयोगशाळा , माती परीक्षण प्रयोगशाळा, दूध संकलन व शीतकरण केंद्र, FM रेडियो, इत्यादी अनेक भौतिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण महाविद्यालय लातूरच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणार हे निश्चित. यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संधी घेवून आलेले अभ्यासक्रम लवकरच सर्वत्र प्रसिद्ध होईल.यासह जो विश्वास राज्यातील नेत्यांनी या महाविद्यालयावर टाकला तो पुर्णपणे सार्थ ठरवत येणाऱ्या काळात लोदग्यातील कृषीमहाविद्यालय राज्यात नावलौकिक मिळवेल,असा विश्वास अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला. प्रवेश मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समन्वयक परवेज पटेल यांनी केले आहे.