निलंगा तालुक्यातील शेळगी येथे अवतरली पंढरी…..जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगी च्या वतीने ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडी मोठया उत्साहात………
निलंगा प्रतिनिधी:-निलंगा तालुक्यातील शेळगी येथे बालचमूंनी काढलेल्या ग्रंथ व वृक्ष दिंडीत गावकऱ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील शेळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगव्या पताका, डोक्यावर ग्रंथ व रोपटे, वारकऱ्यांचा पोशाख, टाळ, मृदंगाचा निनाद, हरिनामाचा जयघोष करीत गावातून विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती.
निलंगा तालुक्यातील शेळगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आज सकाळी भव्य बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. दिंडीत शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेषात,विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये नटून सहभागी झाले होते. यामुळे साक्षात पंढरपूर हे गावात अवतरल्यासारखी वाटत होते
या वेळी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरात आरती करण्यात आली
या दिंडीत विद्यार्थ्यांबरोबर च गावातील सरपंच संगीताताई बिरादार , मुख्याध्यापक राम पांचाळ, नरहरे, ऊंबरे मॅडम, निरगुडे मॅडम,शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अंबिका माने, व कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शहाजणी चे संचालक बंकट बिरादार, व गावातील प्रतिष्ठित नागरिक राम माकणे, राम वैजनाथ रोडे, पोलीस पाटील अनिल पाटील, तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्या व गावातील सर्व नागरिक महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.