ग्राहक पंचायतच्या तालुका अध्यक्षपदी अँड नारायणराव सोमवंशी यांची बिनविरोध निवड
निलंगा (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांची दिनांक २५. जून २०२३ रोजी नवीन ग्रामपंचायत इमारत दुर्गा नगर दापका येथील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे विचार व मनोगत विचारात घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी यांनी अँड. नारायणराव सोमवंशी यांची ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा केली. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रा. सतीश माने, विभागीय संघटक प्रा. हेमंत वडणे जिल्हा संघटक बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अँड. नारायणराव सोमवंशी, व तालुका ग्रामपंचायत च्या उपाध्यक्षपदी प्रकाश धोंडदेव, तालुका संघटक भागवत धुमाळ. आदी कार्यकर्त्यांची यावेळी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अँड नारायणराव सोमवंशी हे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निलंगा येथील कार्यरत असून त्यांनी त्यांच्या न्यायालयीन प्रकरणात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी सबंध वनराई या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्य केले असून त्यांनी शेकापच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात व जिल्ह्यात अनेक आंदोलन करून एक वेगळा ठसा निर्माण केला होता.सध्या काँग्रेस पक्षाचे निलंगा तालुका कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विभागीय अध्यक्ष सतीश माने व ग्राहक पंचायतचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, विभागीय संघटक प्रा. हेमंत वडणे, जिल्हा संघटक, बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील सर्व मान्यवरांना नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीबद्दल अँड. नारायणराव सोमवंशी व त्यांच्या टीमवर तालुका स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.