सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे, मे एस. कुमार आणि गवाणे ग्रामविकास मंडळ , मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थीना शैक्षणिक मदत
मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे यांच्यातर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे व बालवाडीतील विद्यार्थीना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याच गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि मे. एस कुमार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर गवाणे, मधील इयत्ता ८ वी ते १० च्या विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद रूणकर सर यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत विश्वास प्रभुदेसाई सर यांनी केले. या समारंभाला गवाणे ग्रामविकास मंडळाचे सदस्य संजय गवाणकर, महेश आयरे,जयवंत मालणकर, विजय गोरूले, व संतोष पांचाळ यांची विशेष उपस्थिती होती. तसेच गवाणे सरपंच सौ. नयना आयरे, दारोम सरपंच कु. लिंगायत, गवाणे पो.पा. गणेश तेली, शिरवली पो.पा. नांदगावकर, माजी सरपंच सुर्यकांत मेस्त्री, संतोष राणे , उमेश गवाणकर तसेच विलास गोरूले, गणेश भुसेकर, गजानन राणे, संतोष राऊत आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. या शैक्षणिक मदतीसाठी मे. एस कुमार व मुंबई स्थित चाकरमानी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थाध्यक्ष अशोक तळेकर यांनी मे.एस.कुमार यांचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांनी सर्वक्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवून आपले भविष्य उज्वल करावे असेही त्यांनी संबोधित करून कार्यक्रमाची सांगता केली.