दिनांक 29/06/2023 रोजी बकरी ईद निमित्त वाहतूक मार्गात बदल…
दिनांक 29/06/2023 रोजी बकरी ईद साजरी होत असल्याने दयानंद गेट, बार्शीरोड, लातूर येथील इदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्यने नमाज पठणासाठी येतात.त्यामुळे नमाज पठणाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होऊन रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतो.लोकांच्या दैनंदीन कामकाजानिमित्त व दळणवळणानिमित्त त्यांना विविध ठिकाणी पोहोचणे निकडीचे असते. सदरच्या अडचणी लक्षात घेता सदर भागातून वाहतूक बंद करणे व वाहतूक वळविणे अपरिहार्य आहे.
दिनांक 29/06/2023 रोजी सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत वाहतूकीस बंद असणार मार्ग
अ) ईदगाह मैदान, दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अप्पे अॅटो शोरूम बार्शीरोड , तसेच त्यालगतचा स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग( रेल्वे लाईनचा समांतर रस्ता) सर्व वाहनांना (एस.टी. बसेस, ट्रक, टेम्पो, टॅक्सी , ट्रॅव्हल्स , मिनीडोअर , कार व मोटारसायकल ईत्यादी) वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहेत.
ब) तरी जनतेने खालील मार्गाचा अवलंब करावा.
1) शिवाजी चौकातून पीव्हीआर चौकाकडे जाणारी एस.टी. बसेस, इतर मोठी वाहने हे तहसील कार्यालय समोरून ओव्हर ब्रिज वरून औसारोड ने राजीवगांधी चौक – छत्रपती चौक टी पॉईंट मार्गे जातील व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पी.व्ही.आर. चौकाकडे जाणारे मोटार सायकल,तीनचाकी व चारचाकी वाहने छ.शिवाजी महाराज चौक ते औसारोड ने आशियाना टी पॉईन्ट ,खाडगाव मार्गे पी.व्ही.आर. चौकाकडे जातील किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबोजोगाई रोडने जटाळ हॉस्पिटल – शाम नगर इंडिया नगर पीव्हीआर चौकाकडे जातील.
2) बार्शीरोड ने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणारी जड वाहने व एस. टी. बसेस हे पी.व्ही.आर. चौकातून वळून ओैसा टी पॉईन्ट –राजीव गांधीचौक मार्गे शहरात प्रवेश करतील.तसेच मोटार सायकल,तीनचाकी व छोटी चारचाकी वाहने पी.व्ही.आर. चौकातून वळून खाडगाव टी पाईन्ट – आशियाना बंगला मार्गे औसारोड कडे येतील किंवा पीव्हीआर चौक एम.आय.डी.सी. एक नंबर चौकातून इंडिया नगर रोडने जुना रेणापूर नाका मार्गे शहरात प्रवेश करतील.
तरी सर्व नागरीकांनी दिनांक 29/06/2023 रोजी सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गावर वाहनांचा वापर टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे.