जन सामन्याच्या सेवेसाठी शिवसेना सदैव तत्पर
– शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांचे प्रतिपादन
-औश्याच्या करजगावात आरोग्य शिबीराचे उद्घाटन
– शिवसेनेचे जिल्हा प्रमूुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वात आरोग्य मोहिम
लातूर- शिवसेना वर्धापन दिन व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहीदास चव्हाण व औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण औसा तालुक्यात हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून औसा तालुक्यातील 105 गावामधे आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. आज 27 जून रोजी करजगाव या गावात आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. करजगाव येथील या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे औसा तालुका प्रमुख श्री. तानाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
.यावेळी लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स तसेच लातूर ब्लड बँकेचे डॉ. नयन पाटील व त्यांची टीम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराबद्धल माहिती देत असताना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन शिवसेना ही जन सामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे कसलीही मोठी नैसर्गिक आपत्ती असेल अतिवृष्टी असेल भूकंप असेल वादळ असेल अशा परिस्थितीमध्ये मदतीसाठी सर्वात अगोदर धावून जाणारा हा शिवसैनिकच आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये रक्ताची जर गरज पडली तर स्वतःचे रक्त देण्यासाठी पुढे येणारा हा शिवसैनिकच आहे म्हणून आज सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवरती तेवढाच विश्वास आहे. वेळेप्रसंगी आम्ही रक्त देऊ शकतो आणि सामान्यांसाठी रक्त सांडूही शकतो सामान्यांच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या भावनेतून या संपूर्ण तालुक्यामध्ये जनसामान्यांची सेवेसाठी या शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी तालुक्यातील जनतेने सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले. सूत्र संचलन उपतालुका प्रमुख निलेश अजने यांनी केले व आभार प्रदर्शन माजी तालुका प्रमुख श्री संजय भाऊ उजळंबे यांनी केले.
तसेच या शिबिरामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी नागरिकांना औषध उपचार देण्यात आले.
यावेळी औसा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आण्णा आर्य, जिल्हा महिला संघटीका जयश्रीताई उटगे, शिवसेनेचे बजरंग दादा जाधव,उपतालुका प्रमुख निलेश अजने, उप तालुका प्रमुख संतोष सुर्यवंशी, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, पंचायत समिती सदस्य विनोद भैया माने, सर्कल प्रमुख महादेव साळुंखे,उप सर्कल प्रमुख अनील चव्हाण शाखाप्रमुख अनिकेत वाकसे , उप शाखा प्रमुख श्याम जाधव , करजगाव चे सरपंच विलास कारे ,ग्रामपंचायत सदस्य सचिन गवळी, श्रीमंत दळवे, अनिरुद्ध वाकसे, छावा संघटनेचे तालुकाप्रमुख नागेश मुगळे ,तुळशीराम गवळी, अर्जुन सातपुते, हनुमंत जाधव, शुभम दळवे ,राजेंद्र भडे ,जब्बार सय्यद ,शिवराज पाटील, रमेश दळवी, सुशील मोगरगे, राजेंद्र मुगळे ,माणिक वाकसेव, शिवसैनिक गावकरी उपास्थित होते.