• Wed. Apr 30th, 2025

पंतप्रधान मोदीजींनी आपल्या कार्यातून सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम केले- खा.सुधाकर श्रृंगारे

Byjantaadmin

Jun 28, 2023

पंतप्रधान मोदीजींनी आपल्या कार्यातून सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम केले- खा.सुधाकर श्रृंगारे

लातुर (प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 80 करोड लोकांना मोफत राशन, 11.8 कोटी नागरिकांना पाण्याची सुविधा, 100 टक्के घरांना वीज, 3 कोटी लोकांना पक्‍की घरे, ईडब्ल्यूएस अंतर्गत येणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 12 कोटी शेतकर्‍यांना वर्षाला 26 हजाराची मदत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 9.6 करोड नागरिकांना एल.पी.जी.चे कनेक्शन अशा विविध योजनेतून सर्व सामान्य नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्याचे काम केले. यामध्ये 2380 करोड निधी लातूरच्या विकासासाठी आणण्याचे काम केले. याबरोबरच देश हितासाठी 370 कलम रद्द, तीन तलाकाला न्याय देण्याचे काम केले. त्याबरोबरच अयोध्या येथील राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. त्यामुळे खर्‍या अर्थाने पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांला न्याय देण्याचे काम केलेले आहे असे प्रतिपादन लातूरचे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी केले.
यावेळी ते भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा यांच्यावतीने जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यायाच्या सभागृहात मोदी ऽ(अ‍ॅटदीरेट) 9 युवा संवाद व बुथ सशक्‍तीकरण व घरघर चलो अभियानाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा राज्य कार्यकारिणीचे सदस्य तथा वैद्यकीय सेलचे सहसंयोजक डॉ.राठोड, भाजपाचे संघटक सरचिटणीस अ‍ॅड.दिग्विजय काथवटे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, छत्रपती संभाजी राजे मंडलाचे अध्यक्ष प्रेम मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सूरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सन्मान तुलसी वृक्ष देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला यावेळी समन्वयक विनोद जाधव, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, सागर घोडके, संतोष तिवारी, सुनिल राठी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य शैलेश कचरे,  प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य शिरीन मॅडम यांच्यासह प्राध्याधपक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदीजींनी देशाची प्रतिमा जगात उंचावण्याचे काम केले
– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशाचे पंतप्रधान श्री मोदीजींना स्टेट व्हिजीट म्हणून निमंत्रित केले होेेते. त्यांना 21 तोफांची सलामी देऊन स्वागत केले. संसदेसमोर भाषण करण्याची दुसर्‍यांदा संधी त्यांना मिळाली. विविध प्रकारचे उद्योजक व राजकीय आठ करार केले. भारतात दुतावास बंगळूर व अहमदाबाद येथे काढण्याचे जाहीर केले. चीनला पर्याय म्हणून भारताला जगातून पसंती मिळत असल्याचे बोलले जात आहे. मोदींना भारताचे जनक म्हणून गौरविले जात आहे. मोदींचा इजिप्‍तमध्ये राष्ट्रपती अब्दूल फतह अत्म सी.सी. यांनी ऑर्डर ऑफ द नाईल हा सर्वोच्च अवार्ड देऊन गौरव केला. हा मोदींना मिळालेला तेरावा अवार्ड आहे. 11 व्या शतकातील ऐतिहासिक अनहकीम मशीद गीझाच्या पिरॅमीडचे दर्शन मोदीजींनी घेऊन बंधूत्वाचा संदेश जगाला दिला. मोदीजींच्या या गौरवात्मक कार्यामुळे भारताची व परदेशातील भारतीय नागरिकांची प्रतिमा जगात वाढलेली आहे. हा देशातील दीडशे कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचे अभ्यासपूर्ण विचार माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केले.

मोदीजींच्या पाठिशी राहून नवीन व सशक्‍त राष्ट्र उभारणीसाठी साथ द्यावी – अजितसिंह पाटील कव्हेकर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2013-14 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांनी पहिल्या टप्प्यांमध्ये सर्वसामान्यांचे बँक खाते काढून डिजिटल इंडियाची सुरुवात केली. यामुळे बाजारामध्ये माल विकणारा आणि माल घेणारा दोघेही डिजिटल झाले. जनधन योजनेच्या माध्यमातून दीड कोटी लोकांचे खाते काढण्याचे काम करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत जे इतर देशात शक्य झाले नाही ती कामे नऊ वर्षात करून भारत देशाला जागतिक उंचीवर नेहून ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. आपल्या खासदारांच्या स्वाक्षरीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम रद्द केले. तीन  तलाकाची पध्दत याबरोबरच अनेक विकासाची कामे करून जागतिक स्थरावर भारतियांचा सन्मान वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाणीव ठेऊन यापुढील कालाधीतही मोदीजींच्याच पाठिशी राहून नवीन व सशक्‍त राष्ट्र उभारणीसाठी साथ द्यावी असे आवाहन भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed