तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्तारावर भर दिला आहे. मात्र, काँग्रेसने तेलंगणात केसीआर यांची कोंडी केली आहे. राज्यातील 35 नेते काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. या नेत्यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणिRAHUL GANDHI यांची भेट घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार पी श्रीनिवास रेड्डी आणि माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव त्यांच्या समर्थकांसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत औपचारिकपणेCONGRESS पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, तेलंगणा विधानसभेच्या 119 जागा आहेत. राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका आहेत.. तेलंगणा आंदोलनात CONGRESS सक्रिय भूमिका आणि सोनिया गांधी यांच्या योगदानाची लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी कार्यक्रमाकांचे आयोजन केले जाणार आहे.काँग्रेसने 100 मतदारसंघात एकूण 25 लाख लोकांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 हजार ते 30 हजार समर्थकांची नोंदणी केली जाणार आहे. या माध्यमातून काँग्रेस केसीआर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करणार आहे.दरम्यान, केसीआर हे दोन दिवसीय MAHARASHTRA दौऱ्यावर आहेत. सोमवारी केसीआर आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांच्या सोबत तब्बल ६०० गाड्यांचा ताफा होता. मंगळवारी ते पंढरपुरात पांडूरंगाचे दर्शन घेणार आहेत. केसीआर यांच्या पक्षात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे.