PUNE कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी माजी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर आता मुंबईतील आयएएस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली. मुंबईतील आयएएस लॉबीने उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जयस्वाल यांच्यावर झालेल्या कारवाईने आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीमधये अस्वस्थता पसरल्याने त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात तब्बल साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते सर्व पैसे वसूल करणार असल्याचाही इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. कोरोना सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लाईफ लाईन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर ईडी कारवाई केली.या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याचंही सांगण्यात आलं. जयस्वाल यांच्यावरील कारवाईमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरल्याचही सांगण्यात येत होत. सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांचा बळी जात असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.