ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार आणि अल्पसंख्याक जाती जमाती यांच्या न्याय मागण्यांसाठी लोकसभेत सकारात्मक विचार मांडणार!-खा.सुधाकर श्रृंगारे
लातूर ः ओबीसी ,भटके विमुक्त, बलुतेदार आणि अल्पसंख्याक जाती जमाती यांच्या न्याय मागण्यांसाठी लोकसभेत सकारात्मक विचार मांडणार असे प्रतिपादन खा.सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर येथे दि.25 जुन रोजी’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती 2023 ’निमित्ताने ओबीसी एकजुट परिषदचे डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृहात उद्घाटनपर भाषणात खा.सुधाकरराव श्रृंगारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहरजिल्हाध्यक्ष गुरुनाथराव मगे हे होते.
खा.श्रृंगारे त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.बब्रुवान खंदाडे, अॅड.श्रीधर कसबेकर, डॉ.डी.टी.पवार, अंकुश जाधव, अॅड भारत चामे,देवा गडदे यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी प्रास्ताविक परिषदेचे संयोजक राजेंद्र वनारसे यांनी करताना, ओबीसी आरक्षण समर्थकांनी एकजुटीने केंद्र व राज्य सरकारचे प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांकडे लक्ष केंद्रित करून पुर्ततेसाठी आग्रह केला पाहिजे म्हणून खा.सुधाकर शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे प्रयत्न करू या. यावेळी जनगणना करतांना अनुसूचित जाती जमाती प्रमाणे ओबीसी करिता स्वतंत्र कालम असावा आणि घटनात्मक अधिकार प्राप्त करून ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव लोकसभा आणि विधानसभा असावे आणि तो पर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपा कडून बहुसंख्येने ओबीसी भटके विमुक्त यांना उमेदवारी देण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी या क्रिकेट स्पर्धेत विजय मिळविलेल्या लातूर येथील खेळाडू अनिकेत शिवकुमार स्वामी, काटे, राठोड यांचा सत्कार खा.श्रृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांचे स्वागत परिषदेचे जिल्हाप्रमुख सदाशिव चौगुले, मनोहरराव पांचाळ, हनुमंत बडे, राजाभाऊ साबळे यांनी केले. परिषद यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक व्यंकटराव वाघमारे, अमोल गिते, अजय भुमकर, चंद्रकांत इगवे, लक्ष्मण राठोड, शिवा राठोड, शेषेराव राठोड, के.के.राठोड, तुकाराम चव्हाण, वसंतराव मदने, सचिन मदने, संजय सोनकांबळे, वैजनाथअप्पा हुडे, सतीश ठाकुर, काकासाहेब चौघुले, नागेंद्र पुरी आदिंनी परिश्रम घेतले.
ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार आणि अल्पसंख्याक जाती जमाती यांच्या न्याय मागण्यांसाठी लोकसभेत सकारात्मक विचार मांडणार-खा.सुधाकर श्रृंगारे
