• Fri. May 2nd, 2025

राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त  आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Jun 26, 2023

राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त  आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर(जिमाका): राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार आणि सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षि छत्रपती शाहू महाराज चौकातून समता दिंडीला सुरुवात झाली.जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर समता दिंडीचा समारोप झाला. समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक या समता दिंडीत सहभागी झाले होते.

सामाजिक न्याय भवन येथे राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक नय्य भवन येथे आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.यावेळी संभाजी नवघरे व प्रा. विवेक सौताडेकर यांनी मार्गदर्शन करताना लोककल्याणकारी लोकराजा राजर्षि शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाची प्रेरणा पिढ्यान पिढ्या ऊर्जा व सामाजिक जाणिव देत राहील, असे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

नशामुक्त भारत अभियानांतर्गत प्रबोधन

जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत समारोप समारंभात ह.भ.प. येरोळेकर महाराज यांनी व्यसनमुक्तीप्र प्रबोधन केले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सास्तुरकर यांनी केले, नागेश जाधव यांनी आभार मानले.

सामाजिक न्याय भवन येथे वृक्षारोपण

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *