NILANGA फुले शाहू चारिटेबल अँड वेलफेअर फाउंडेशन व साई क्रीटीकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने….मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवाजी चौक निलंगा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शरीराचे उद्घाटन माननीय श्री विनोद आप्पा आर्य यांनी केले तर या कार्यक्रमासाठी पंडित अण्णा धुमाळ, अरविंद भातांब्रे साहेब, दयानंद चोपणे, इस्माईल लदाप, हरिभाऊ सगळे, गोविंद सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे, प्रमोद कदम, राजकुमार लामतुरे सर (मुख्याध्यापक शिवाजी महाविद्यालय), धम्मानंद सूर्यवंशी सर, अखिल देशमुख पत्रकार व ज्येष्ठ पत्रकार मोहन शिरसागर सर, संतोष कांबळे सर, अजय कांबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. शिबिरात १०७ लोकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरातील तज्ञ डॉक्टर्स डॉ. अरविंद भातांब्रे, डॉ.राजशेखर मेनगुले, डॉ.शीवकन्या यादव मॅडम,राहुल गावकरी, सातपुते संतोष व सिस्टर शिवकन्या कांबळे जमलेल्या रुग्णांची व्यवस्थित तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी देवदत्त सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष (शाहू फुले चॅरिटेबल अँड वेलफेअर फाउंडेशन) साहेबराव कांबळे, लक्ष्मण सूर्यवंशी, अल्ताफ शेख, व गूराले श्रीराम यांनी परिश्रम घेतले