• Sun. Jun 22nd, 2025

कैरोव अल-हकीम मशिदीत गेले नरेंद्र मोदी, जाणून घ्या काय आहे भारताशी संबंध

Byjantaadmin

Jun 25, 2023

अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) ते कैरोव येथील अल-हकीम मशिदीत पोहोचले. दाऊदी बोहरा समुदायाने 11 व्या शतकात या मशिदीचे नूतनीकरण केले होते.याशिवाय युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात या मशिदीचा समावेश करण्यात आला आहे. मशिदीत पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी मशिदीत उपस्थित लोकांची भेट घेतली.

नरेंद्र मोदी, यांनी मशिदीच्या भव्य वास्तू आणि नक्षीकामाचेही निरीक्षण केले. यानंतर त्यांना अनेक भेटवस्तूही देण्यात आल्या. यामध्ये काचेत बंदिस्त लाकडी बोट, पोर्सिलेन गिफ्ट, मशिदीचे चित्र यांचा समावेश आहे.1997 नंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान इजिप्तच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. कैरोव इस्लामिक वास्तुकलेसाठी जगभरात ओळखली जाते. या मशिदीचे बांधकाम 10 व्या शतकात फातिमी घराण्याचा पाचवा खलीफा अल-अजीझ यांनी केले होते.

भारताशी संबंध काय?

1970 मध्ये दाऊदी बोहरा समाजाचे नेते मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी मशिदीच्या दुरुस्तीची जबाबदारी घेतली. त्यांचा भारताशी संबंध होता. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना भारतात मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.मशिद 24 नोव्हेंबर 1980 रोजी औपचारिकपणे उघडण्यात आली. आता पर्यटकही या मशिदीला भेट देऊ शकतात. दाऊदी बोहरा हा भारतातील एक छोटा मुस्लिम समुदाय आहे. गुजरातमध्ये या समाजाची लोकसंख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *