• Mon. Jun 23rd, 2025

‘आदिपुरूष’मध्ये श्रीराम – बजरंगबलीला बदनाम करण्याचं पाप भाजपनं केलं ; पटोलेंचा गंभीर आरोप!

Byjantaadmin

Jun 25, 2023

सांगली शहरात आज काँग्रेस पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सांगलीत काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, युवा नेते विशाल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केलीनाना पटोले म्हणाले, “एका हुकूमशाही प्रवृत्तीला कर्नाटकच्या जनतेने उत्तर दिलं. भाजपला चांगलाच धडा शिकवला. कर्नाटकमध्ये बजरंगबलीच्या नावावर भाजप निवडणूक लढायला गेले. त्याच बंजरंगबलीने भाजपला कर्नाटकात पटखनी दिली.”

पटोले पुढे म्हणाले, आता आदिपुरूष पिक्चर काढला. या आदिपुरूषमध्ये भगवान श्रीरामाला आणि बजरंगबलीला अपमानित करण्याचं काम भाजपने केलं आहे. भाजपच्या जवळचा असलेला मनोज शुक्लाला आदिपुरूष चित्रपट काढायला लावलं. भगवान राम आणि बजरंगबलीला बदनाम करायला भाजपने मागेपुढे पाहिलं नाही. भाजपचे लोक सांगतात आता आम्ही चित्रपटातले संवाद बदलून टाकू. पण श्रीराम बदनाम करण्याचं काम, यांनी केलंय. आता भगवान रामही भाजपसोबत नाहीत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Nana Patole On Adipurush :

वारकऱ्यांवर लाठीचार्ज –

आळंदीला जेव्हा वारी सुरू झाली. तेव्हा या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करायला राज्यातलं असंवैधानिक सरकारने मागेपुढे पाहिलं नाही. वारकरी परंपरेला शिस्त शिकवायची गरज नाही. पण, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण या वारकरी प्रथेवरही या सरकारने लाठीचार्ज केला, असे  (Nana Patole) म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *