मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पत्र लिहिले होते. हे पत्र ट्वीट करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या या गंभीर आरोपांवर आता महसूलमंत्र्यांसह राज्य सरकार काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
निलंबित अमित रामोड यांच्याशी संबंधित नेमका वाद काय आहे?
डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने १० जूनला अटक केली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. रामोड न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या मागणीनुसार, विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये; तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्याबाहेर जाऊ नये, असंही निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

पाच कोटींची स्थावर मालमत्ता
डॉ. अनिल रामोड यांच्या घरातून सीबीआयने सुरुवातीला सहा कोटी ६४ लाख रुपये आणि कार्यालयातून एक लाख २८ हजार रुपये जप्त केले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तपासात त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावे पाच कोटी ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले. रामोड यांनी ही संपत्ती जमवली कोठून, असा प्रश्न सीबीआयने उपस्थित केला. भूधारकांची प्रकरणे निकाली काढताना घेतलेल्या पैशांतून ही मालमत्ता उभी केली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने अधिक तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयने न्यायालयात म्हटले होते.