निलंगा पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक
निलंगा (प्रतिनिधी):-आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त निलंगा पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, शासनाने दिलेल्या नियमाचे व लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाचे पालन करून आषाढी एकादशी व बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी यावेळी केली आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड, गोपनीय शाखेचे प्रमुख दादा शिंदे, यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अनेक हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित होते.