शिर्डी : 2 हजाराच्या नोटा 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत अशी घोषणा RBI ने केली आणि सगळंच बदललं. २ हजाराच्या नोटा खपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या शोधू लागले. काही ठिकाणी नोट बदलण्यासाठी पैसे घेतले जात होते.ही सगळी परिस्थिती पाहता काहींनी सोनं खरेदी केलं तर काहींनी आपली श्रद्धा आहे तिथे दान केलं. 30 सप्टेंबर पर्यँतच दोन हजारांच्या नोटा चलनात सुरू राहणार असल्याने गेल्या महिनाभरात साईबाबांच्या दानपेटीत 2000 च्या नोटांचे दान वाढले आहे.अवघ्या महिनाभरात तब्बल अडीच कोटी रुपयांच्या 12 हजार नोटा साईबाबांच्या दानपेटीत मिळाल्या आहेत…
मे महिन्यात रिजर्व बँकेने मोठा निर्णय घेत 30 सप्टेंबर नंतर दोन हजारांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला.साईंच्या दानात तुरळक आढळणाऱ्या दोन हजारांच्या नोटा आता मात्र मोठ्या प्रमाणात भक्त दान करताना दिसत आहेत. मागील एक महिन्यात साई संस्थानला दान स्वरूपात दोन हजारांच्या अडीच कोटींचे दान प्राप्त झाले असून तब्बल १२००० नोटा प्राप्त झाल्या आहेत..