• Sat. Aug 16th, 2025

बँकेतील ११० कोटींवर डल्ला मारण्यापूर्वीच प्लॅन फसला; उपसंरपंचासह ६ जण अटकेत, काय घडलं?

Byjantaadmin

Jun 22, 2023

देशभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीच्या बँक खात्याचे तपशील मिळवून हॅकरच्या मदतीने ११० कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.शेख इरफान शेख उस्मान (वय २३, रा. मिटमिटा), वसीम इसाक शेख (वय ३६, रा. पडेगाव), शेख कानित शेख अय्युब (वय १९, रा. रूप महल, एसटी कॉलनी), अब्बास युनूस शेख (वय ३४, मिटमिटा), अमोल साईनाथ करपे (वय २५, रा. कुडापूर झिंझुर्डी, ता. गंगापूर), कृष्णा बाळू करपे (वय २५, रा. कुडापूर झिंझुर्डी, ता. गंगापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील अमोल करपे हा उपसरपंच असल्याची माहितीही सायबर पोलिसांनी दिली.

cyber fraud.

काय घडलं?

सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीच्या बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट बँक खात्यात उपलब्ध असलेले ११० कोटी रुपये काही जण हॅक करणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून १७ जूनला दुपारी दीडच्या सुमारास सायबर पोलिसांनी हॉटेल देवप्रिया येथे छापा मारून सहा जणांना ताब्यात घेतले. यातील इरफान शेखने बँक खात्याची माहिती काढली होती. वसीम इसाक शेख, अमोल साईनाथ करपे, कृष्णा करपे आणि अब्बास शेख हे सर्वर जण क्रिप्टो करन्सी विकल्यानंतर हे पैसे आपसात वाटणार होते.

या हॅकर्सच्या टोळीकडे आणखी २० कार्पोरेट बँक खाती असल्याची माहिती समोर आली आहे. टोळीकडून दोन लॅपटॉप, सहा मोबाइल जप्त करण्यात आले. या सहा जणांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविणा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय साबळे, चंद्रकांत दंडे, रामेश्वर काळे, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अमोल देशमुख, सचिन संपाळ, शाम गायकवाड, गोकुळ कुत्तरवाडे, अमोल सोनटक्के, अभिलाश चौधरी, संदिप पाटील, प्रविण कुऱ्हाडे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *