फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याच्या अकाली मृत्यूबाबत एका वर्षानंतर डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोविड १९ ची लस असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शेन वॉर्नचा मृत्यूृ झाला होता. थायलंडला सुट्टीसाठी गेला असताना ही दुर्दैवी बातमी आली होती. मृत्युसमयी त्याचं वय ५२ होतं. त्यामुळं त्याच्या निधनाचा क्रीडा जगताला व त्याच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला होता.
शेन वॉर्ननं कोविडच्या लसीचे दोन डोस घेतले होते. त्यानं जी लस घेतली होती, त्यामुळं हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात, असं आता सांगितलं जात आहे.निधनाच्या ९ महिने आधी शेन वॉर्ननं mRNA या कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतला होता. या लसीमुळं हृदयाशी संबंधित आजार वाढतात. ही लसच वॉर्नच्या मृत्यूचं कारण ठरली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ख्रिस नील आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा यांनी शेन वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास केला. त्यांच्या मते ज्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा सौम्य त्रास आहे. अशा व्यक्तीनं कोविड mRNA लसीचा डोस घेतल्यास त्याचा हृदयाचा त्रास वाढू शकतो.’शेन वॉर्न हा स्वच्छंदी स्वभावाचा होता. त्याची मौजमस्तीचं जीवन जगत होता. त्याचं वजनही जास्त होतं आणि तो धूम्रपानही करायचा. आरोग्याची फारशी फिकीर तो करायचा नाही. हे खरं असलं तरी वयाच्या ५२ व्या वर्षी एका स्पोर्ट्समनला हृदयविकाराचा झटका ही काही सामान्य बाब नाही, असं मल्होत्रा म्हणाले.शेन वॉर्नच्या रक्तवाहिन्यांमध्ये किचिंत फुगवटा असावा आणि लसीचे डोस घेतल्यानंतर त्यात वेगानं वाढ झाली असावी. माझ्या अनेक रुग्णांच्या बाबतीत व खुद्द माझ्या वडिलांच्या बाबतीतही मला तसा अनुभव आला आहे. फायझर mRNA लसीचे दोन डोस घेतल्यानंतर माझ्या वडिलांचा हृदयविकार झपाट्यानं बळावला व नंतर त्यांचा मृत्यूही झाला, असं डॉक्टर मल्होत्रा यांनी सांगितलं. mRNA या लसीचा वापर ताबडतोब थांबवण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.