• Sun. Aug 17th, 2025

निलंग्यात होणार नुतन न्यायालयाची इमारत मुगाव-वांजरखेडा, गौर- बिंदगीहाळ रस्त्यावर पुल उभारण्यास मान्यता;  माजी मंत्री आ. निलंगेकरांचा पाठपुरावा

Byjantaadmin

Jun 19, 2023

निलंग्यात होणार नुतन न्यायालयाची इमारत
मुगाव-वांजरखेडा, गौर- बिंदगीहाळ रस्त्यावर पुल उभारण्यास मान्यता;  माजी मंत्री आ. निलंगेकरांचा पाठपुरावा

 

निलंगा/प्रतिनिधीः- निलंगा शहरातील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत जीर्ण झालेली असून ती अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयासाठी नुतन व भव्य इमारत उभारली जावी अशी मागणी विधिज्ञासह नागरीकांकडून होत होती. त्यानुसार न्यायालय इमारत उभारण्यासाठी शहरातील निम्न तेरणा प्रकल्प वसाहत परिसारात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. त्यानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत जलसंपदा नियामक मंडळाने जागा हस्तरांतरीत करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता निलंग्यात नुतन न्यायालयाची इमारत होणार आहे. तसेच  मांजरा प्रकल्पाअंतर्गत डोंगरगाव बंधार्‍याच्या बुडीतक्षेत्रात असलेले मुगाव ते वांजरखेडा व गौर ते बिंदगीहाळ या रस्त्यावर नवीन पुल उभारण्याची मागणी होत होती. सदर मागणी लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे या दोन्ही रस्त्यावर नवीन पुल बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे.  सदर मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकरयांचे मतदारसंघातील नागरीकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
. निलंगा शहरात जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत असून ही इमारत जीर्ण झालेली असून ती अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयासाठी भव्य व सुसज्ज अशी नवीन इमारत  उभारण्यात यावी अशी मागणी विधिज्ञासह नागरीकांकडून होत होती. सदर मागणी लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरात निम्न तेरणा वसाहत परिसरात नुतन न्यायालयाची इमारत उभारली जावी आणि याकरीता निधी मंजूर करावा अशी मागणी केलेली होती. त्यानुसार जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत निम्न तेरणा प्रकल्प वसाहत परिसरात न्यायालयाची नुतन इमारत उभारण्यासाठी 1.20 हेक्टर जागा हस्तातरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेले मुगाव, वांजरखेडा, गौर व बिंदगीहाळ हे मांजरा प्रकल्पाअंतर्गत असलेल्या डोंगरगाव बंधार्‍याच्या बुडीत क्षेत्रात येतात. डोंगरगाव बंधार्‍यात 2016 पासून पुर्णक्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. बंधारा क्षमतेने भरल्यानंतर मुगाव ते वांजरखेडा, गौर ते बिंदगीहाळ या दरम्याचा रस्ता पाणीसाठ्यामुळे बाधीत होत आहे. तसेच बंधार्‍यातील पाणीसाठ्यामुळे मुगाव, वांजरखेडा, गौर व बिंदगीहाळ येथील नागरीकांसह शेतकर्‍यांना आठ ते दहा किलोमिटर वळसा घालून दैनदिंन कामासाठी जावे लागत आहे. तसेच कांहीवेळा धोकादायक कलाईचा वापरही होत आहे. यामुळे पैशाचा व वेळेचा मोठा अपवव्य होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच याठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे होत होती. सदर बाब लक्षात घेऊन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात दि. 19 जून रोजी जलसंपदा नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर पुल उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. मुगाव-वांजरखेडा, गौर- बिंदगीहाळ रस्त्यावर पुल उभारण्यासह न्यायालयाची नुतन इमारत उभारण्याकरीता जमीन हस्तातरीत करण्यास मान्यता दिल्याबद्दल निलंगा मतदारसंघातील नागरीकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *