उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा
निलंगा येथे उप तालुका प्रमुख मुस्तफा शेख यांच्या हस्ते झेंडावंदन
निलंगा( प्रतिनिधी):- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिनानिमित्त निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे निलंगा उप तालुका प्रमुख शेख मुस्तफा यांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवुन शिंदे-फडणवीस सरकारला जनतेच्या हितासाठी काम करण्याची व खरे बोलण्याची सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महारज यांना पुष्पहार अर्पण करताना करण्यात आली. यावेळी निलंगा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विरोधी विचारसरणी शी लढण्यासाठी ताकद मिळत असल्याने तसेच अनेक प्रादेशिक पक्ष व सामाजिक संघटनेचा मिळत असलेलं पाठींबा पाहता जनतेच्या मनातला सर्वात उत्कृष्ट राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सामान्यांच्या मनात कोरले गेल्याने जनतेला साखर तोंडात भरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने निलंगा शहरांत शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिवस साजरा केला.
यावेळी कांग्रेस चे जेष्ठ नेते दयानंद चोपणे,शिवसेनेचे युवा उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेनेचे युवक तालुका प्रशांत वांजरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, कांग्रेस चे अल्पसंख्याक शहराध्यक्ष सईद सय्यद, शिवसेना अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख महेबूब मिस्त्री, महिला तालुका संघटिका अरुणाताई माने, शिवसेना महिला उपतालुका प्रमुख पांढरे ताई, बजरंग शिंदे, सोनू वाघमोडे, आकाश गायकवाड यावेळी आदी शिवसेना, कांग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहवून सेनेचा 57 वा वर्दापण दिवस साजरा करण्यात आला.