आमदार प्रभू चव्हाण माजी मंञी आ.निलंगेकर यांची भेट
माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांचे घेतले आशीर्वाद
निलंगा/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रभू चव्हाण यांनी निलंगा येथील निवासस्थानी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सदिच्छा भेट घेऊन लातूर जिल्ह्याच्या माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांचे आशीर्वाद घेतले…
यावेळी आमदार प्रभू चव्हाण यांचा निलंगेकर परीवाराच्या वतीने यथोचित सत्कार करून स्वागत केले. तसेच विविध राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा दोन्ही आमदारानी चर्चा केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव मंमाळे, निलंगा शहर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी दगडु सोळुंके, अमित राठोड व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.