• Mon. Aug 18th, 2025

धक्कादायक! खेळता खेळता कार झाली लॉक, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Byjantaadmin

Jun 19, 2023

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. या मुलांचे एका चारचाकी वाहनात मृतदेह सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

nagpur kids died in car

शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. परंतु, मुलांचा छडा लागला नाही.या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता ही मुलं गाडीमध्ये लॉक झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. या मुलांचा गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.मृत झालेल्या मुलांमध्ये दोन भावंडे आणि त्यांची एक मैत्रीण होती. एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळपासून ही मुलं सापडत नव्हती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचं अपहरण झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु, नंतर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. या मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *