नागपूर येथे काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी आज (रविवारी) जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचे कौतुक केलं. आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे, याबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण केले आहे.
काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केला होता आणि कोर्टामध्ये त्याबद्दल क्षमा मागायला देखील नकार दिला. त्यावर आशिष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात बोलल्याने तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.आज आशिष देशमुखांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. देशमुखांना पुन्हा भाजपमध्ये का घेतले याचे कारण फडणवीसांनी यावेळी सांगितले.फडणवीस म्हणाले, ” राहुल गांधींनी ज्यावेळीओबीसी समाजाचा अवमान केला आणि कोर्टामध्ये त्याबद्दल क्षमा मागायला देखील नकार दिला. त्यावर अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका ही आशिष देशमुखांनी मांडली. त्यावेळी bawankule यांच्यासोबत मिळून ठरवले की आता देशमुखांना पुन्हा भाजपमध्ये घेतले पाहिजे,”
“सावनेरमधून निवडणूक लढवून आशिष देशमुख यांनी sunil kedar यांच्या तोंडचे पाणी पळवले. ते काही काळ बाहेर राहून परत पक्षात आले आहेत. पण त्यांनी घेतलेल्या निवडणूक न लढवण्याच्याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही,” असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
” हा निर्णय घेण्याआधी ashish deshmukh यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यामुळे त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला की श्रद्धा भाजपवर आणि सबुरी स्वतःच्या जीवनामध्ये,” अशा शब्दात फडणवीसांनी देशमुखांच्या कामाचे कौतुक केले.