महाराष्ट्र महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेचे घवघवीत यश
निलंगाः येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२३ परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. या परीक्षेला तृतीय वर्षाचे एकुण १२९ विद्यार्थी सामोरे गेले व त्यातील ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य विभागाचा अंतिम वर्षाचा निकाल सुमारे ९०% इतका लागला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी समाधान व्यक्त केले असून संस्था सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. माधव कोलपूके, माजी विभागप्रमुख डॅा. अरूण धालगडे, डॅा. सुर्यकांत वाकळे, डॅा. नरेश पिनमकर, प्रा. संदिप सुर्यवंशी, प्रा. शिल्पा कांबळे आणि प्रा. अक्षय पानकुरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.