शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे.अयोध्या पौळ या वेळोवेळी ठाकरे गटाची बाजून जोरदारपणे मांडताना दिसतात. ठाकरे गटावर होणाऱ्या हल्ल्याला पौळ त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतात. गेल्या महिन्यात त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना धारेवर धरले होते. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना पौळ विविध मुद्द्यावरून अनेक प्रश्न विचारत असतात. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा शिवसेनेने (ठाकरे गट) निषेध व्यक्त केला आहे.अयोध्या पौळ या एका कार्यक्रमासाठी कळव्यात आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले. त्यानंतर त्यांच्यावर शाई फेकली. या घटनेने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
बांगरावरील टीकेमुळे पौळ चर्चेत
कळमनुरी बाजार समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान santosh bangar यांनी एक पण केला होता. ते म्हणाले होते की, “१७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही.” मात्र त्यांना १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणता आल्या. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी बांगरांना लक्ष केले होते.पौळ म्हणाल्या होत्या की, “दोन दिवसांपूर्वी मी hingoli दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. आता कधी काढताय मिशी?”
#शाईफेक pic.twitter.com/vhu7M8Tmai
— Seema Adhe (@AdheSeema) June 16, 2023
अयोध्या पौळ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया
”मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी.” अस ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच, एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे