उस्मानाबादमध्ये ‘मोदी@9’ निमित्त आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून दिल्याचे जाहीर करा, असे थेट आव्हान दिले.फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार आहेत का?, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला. त्यावर काही बोलणार आहेत का?, उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार होणार का?, जर असे असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून दिल्याचे जाहीर करा”, असं थेट आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.
“हिंदू हृदयसम्राटयांचे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे यांच्या रुपाने पुन्हा एकदा जिवंत करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपबरोबर येऊन सुरू केलं आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने मिळत आहे, आणि यापुढेही मिळत राहणार आहे”, असंही यावेळी फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात मोफत लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. एवढंच नाही तर जगभरात कोरोना लस फक्त पाच देशांनी तयार केली. त्यामध्ये आपला भारत देश होता. मोदींनी भारतासह जागात तब्बल 100 देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवली “, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.दरम्यान,pm modi यांनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती, आज आपल्या देशाला अमेरिका, रशियासमोर कटोरा घेऊन उभं राहावं लागलं असतं”, असं वक्तव्यही फडणवीस यांनी यावेळी केलं.