कष्ट, परीश्रमामुळेच स्वप्न साकार होतात हे सृष्टी ने दाखवून दिले : माजी मंत्री दिलीपराव देशमुख
—————————— ——-
लातूर: पाच दिवस आणि पाच रात्री व ७ तास असे एकूण १२७ तास न थांबता नृत्य करणे ही साधी गोष्ट नाही. यामागे तिने घेतलेले परीश्रम, कष्टामुळेच तिची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली असा सांस्कृतिक क्षेत्रात ही सृष्टी ने लातूर पॅटर्न निर्माण केला आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काढले.
सृष्टी जगताप हिचा आशियाना येथे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे बोलत होते. ते पुढे म्हणाले सृष्टी ने केलेला हा विश्वविक्रम तरूणाईला प्रेरणा देणारा आहे. तिच्या या कार्यांत कुटुंबातील सर्व सदस्य मित्र परिवारानी तिला सकारात्मक उर्जा दिली. या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड करून लातूरची मान उंचावली आहे.
यावेळी जागृतीचे व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, इंदिरा सुत गिरणी चेअरमन बाळासाहेब कदम, संत शिरोमणी मारुती महाराज चे चेअरमन बाजुळगे सर, व्हा चेअरमन शाम भोसले, सुपर्ण जगताप,संभाजी सुळ, संभाजी रेड्डी, शिवाजी कांबळे, सचिन दाताळ, संस्कृती फाऊंडेशन चे डॉ सितम सोनवणे, आजोबा बबन माने, तानाजी फुटाणे, सतीश जगताप, बिभिषण सांगवीकर , बालाजी साळुंखे, हे उपस्थित होते…