• Thu. Aug 21st, 2025

शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेला पण परत आलाच नाही, रात्रीच्या अंधारात घडला धक्कादायक प्रकार

Byjantaadmin

Jun 16, 2023

बुलढाणा : खामगाव तालुक्यात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा जीव गेला आहे. ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरनं काम सुरु असताना लोंबकळणाऱ्या तारा गळ्यात गुंतल्या आणि शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे ही घटना घडलीबुलढाणा जि्ह्यातील खामगावमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप शेतकऱ्याने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पिंप्राळा गावात घडली. १५ जून च्या रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यानं जीव गमावला. श्रीधर दयाराम पटोकार वय ४१ वर्ष रा.पिंप्राळा ता.खामगाव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Shridhar Patokar News

मिळालेल्या माहितीनुसार श्रीधर पटोकार हे १५ जून च्या रात्री आपल्या शेतात ट्रॅक्टरने रोटावेटरद्वारे काम करत होते. याचवेळी शेतातून गेलेल्या लाईनच्या विजेच्या तारा शेतामध्ये लोंबकळत पडलेल्या होत्या, तिथून ट्रॅक्टर जात असताना त्या विजेच्या तारेचा स्पर्श ट्रॅक्टरला होऊन श्रीधर पटोकार यांना विजेचा धक्का लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीधर पटोकार यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. या आधीही विहीगाव तालुका खामगाव येथे उघड्या असलेल्या डीपी मुळे विजेचा शॉक लागून एक गाय मृत्यूमुखी पडली होती. तरीही महावितरणला अजूनही जाग आली नसल्याचा संताप स्थानिकांना व्यक्त केला. एकीकडे अर्धा जून उलटून गेला तरी अद्याप मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. मागील वर्षी देखील तूर, कापूस ,हरभरा यासारख्या नगदी पिकांनी शेतकऱ्यांना निराश केलं आहे. या हंगामात तरी आता आपण संपूर्ण ताकदनिशी स्वतःला झोकून देत चांगलं पीक घेऊन दोन पैसे हाताशी घेऊन या नव्या उमेदीने शेतकरी तयारीला लागला असताना अशा घटना घडल्याने संपूर्ण गावात हळ हळ व्यक्त केली जात आहेदरम्यान, यंदा मान्सूनचं आगमन लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. मान्सून लांबल्यानं शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकटांसह विविध अडचणी शेतकऱ्यांपुढं निर्माण झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *