• Thu. Aug 21st, 2025

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला  15 चारचाकी वाहने सुपूर्द

Byjantaadmin

Jun 16, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला  15 चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर, दि. १६ (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली १५ चारचाकी वाहनांमुळे ‘डायल ११२’ अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून  गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत   : विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही त्यांचे स्वागत केले आमदार प्रवीण दरेकर, आमदार अभिमन्यू पवार यांचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत लातूर विमानतळावर आगमन झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *